Parbhani Bull Tongue News राजेश काटकर
ऍग्रो वन

Video: परभणीच्या शिराळा गावातील शेतकऱ्यांवर विचित्र संकट; दीड महिन्यात १३ बैलांच्या जीभ गळून पडल्या

Parbhani Bull Tongue News: शिराळा बैलांची जीभ गळून पडल्याची ही १३ घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.

राजेश काटकर

परभणी: जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच परभणीच्या शेतकऱ्यांपुढे मोठं संकट आलं आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील शिराळा गावातील जनावरांची जीभ (Bull Tongue) पुन्हा गळून पडली आहे. या विचित्र आणि अज्ञात संकटाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शिराळा (Shirala) गावात आता एका वासराची जीभ गळून पडली आहे. गेल्या दीड महिन्यातली ही १३ वी घटना आहे. (Parbhani Latest News)

१९ ऑक्टोबर २०२२ ला परभणी जिल्ह्याच्या (Parbhani) सेलु तालुक्यातील शिराळा या गावामधील एका शेतकऱ्याच्या बैलांची जीभ अचानक गळून पडल्याची विचित्र आणि तितकीच भयानक घटना घटली होती.

पाहा व्हिडिओ आणि फोटोज -

आतापर्यंत शिराळा गावातील 13 जनावरांची जीभ गळून पडल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे. हा आजाराचा प्रकार नसल्याचं पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केलं आहे. तर अज्ञातांनी जनावरांवर घातपात केल्याच्या संशय व्यक्त केला जात असून गावकऱ्यांनी सेलु पोलिसमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याच्या बैलांची (Bull) जीभ रात्रीत रक्तस्राव होत गळून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिराळा गावातील जवळपास तेरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या सर्व प्रकाराचा सेलु पोलिस तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT