Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा; जिल्ह्यात केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांनीच पिके केले संरक्षित

Parbhani News : राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगाम २०२३-२४ साठी सर्वसमावेशक पीक विमा योजना अमलात आणली आहे

राजेश काटकर

परभणी : पिकांना सुरक्षा कवच म्हणून राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. ही योजना अमलात आणली असली तरी शेतकरी रब्बी हंगामातील पिकांचा पीक विमा (Crop Insurance) काढण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र परभणी (Parbhani) जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचे हे चित्र निर्माण झाले आहे. (Live Marathi News)

राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगाम २०२३-२४ साठी सर्वसमावेशक पीक विमा योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून आपली पिके संरक्षित करण्यासाठी केवळ एक रुपया घेतला जाणार आहे. तरीही परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यास (Farmer) शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ७ हजार ७५३ शेतकऱ्यांनीच आपल्या पिकांचा विमा उतरवल्याचे जिल्हा प्रशासनाकडून  माहिती देण्यात आली,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरीप हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे ५२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रीम लागू झाले आहे. या अग्रीमची भरपाई ही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर येत आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे विमा महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली पिके संरक्षित करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: साकोलीत नाना पटोले पिछाडीवर

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT