Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनला भाव नसल्याने विक्री थांबली; बाजार समितीत शुकशुकाट, गतवर्षीचा सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून

Parbhani News : मागील वर्षी सोयाबीनला ५ हजार २०० रुपये इतका भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु सध्या सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे

राजेश काटकर

परभणी : परभणीच्या पूर्णा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. प्रामुख्याने भाव वाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेल्या सोयाबीनला चार हजार इतकाच भाव मिळत असल्याने विक्री थांबली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन अजूनही पडून आहे. 

मागील वर्षी सोयाबीनला ५ हजार २०० रुपये इतका भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु सध्या (Soyabean Price) सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांकडील माल कसा खरेदी करावा; असा प्रश्न व्यापारांना पडला आहे. तसेच पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यात सध्या २५ ते ३० टक्के शेतकऱ्याकडे (Farmer) हजारो क्विंटल सोयाबीन पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारने व्यापाऱ्यांना सी. सी. अकाउंट व्याज दरात तसेच विविध आकारण्यात येणाऱ्या कर मध्ये सवलत द्यावी; अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तसेच राज्य शासनाने ठरवून दिलेला हमीभाव तरी शेतकऱ्यांना देण्यात यावा; अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून या भावात शेतकऱ्याचा कुठला खर्च निघत नाही. हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील बाजार समिती व मोढ्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

SCROLL FOR NEXT