Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News: अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

राजेश काटकर

परभणी : पाथरी तालुक्यातील लिंबा येथील अल्पभुधारक शेतकरी (Farmer) बाळासाहेब काशिनाथ दळवे (वय ४५) यांनी आज सकाळी शेतात (Parbhani) गळफास घेत आत्‍महत्‍या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. (Tajya Batmya)

लिंबा (परभणी) येथील मयत अल्पभुधारक शेतकरी बाळासाहेब काशिनाथ दळवे यांच्‍याकडे दोन एकर शेती आहे. त्यांच्याकडे भारतीय स्टेट बँक शाखा पाथरीचे कर्ज आहे. शेतात अपेक्षित उत्‍पन्‍न आले नसल्‍याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत असल्‍याचे बोलले जात आहे. मात्र त्‍यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

म्‍हशीला नदीवर घेवून गेले अन्‌

सकाळी म्हैस घेऊन गोदावरी नदीपात्रात चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान म्हशीच्या गळ्यातील कासरा सोडून त्याच कासऱ्याच्या दोरीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत बालासाहेब दळवे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा मोठा परिवार आहे. या घटनेमूळे लिंबा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

SCROLL FOR NEXT