Jalgaon News: बिझनेस लोनच्या नावे गंडविणारा ताब्‍यात; तक्रारदारास २१ लाख सुपूर्द

बिझनेस लोनच्या नावे गंडविणारा ताब्‍यात; तक्रारदारास २१ लाख सुपूर्द
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : आव्हाणे शिवारातील तरुणास कार व बिझनेस लोन मिळवून देण्याच्या नावाखाली २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा (Jalgaon News) गंडा घातला होता. सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्याच्या पथकाने तीन महिने परिश्रम घेत गुन्ह्याचा छडा लावून संशयितांना अटक केली आणि २३ पैकी २१ लाखांची रोकड जप्त केली. (Latest Marathi News)

Jalgaon News
Shirdi News: महसुलमंत्र्यांच्या घरावर धडकणार लाल वादळ; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लॉंगमार्च

आव्हाणे (ता. जळगाव) येथील साहिल वसंतराव गाढे याची फायनान्स कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२२ मध्ये गाढे याने चव्हाण याच्या व्हॅट्‌सअ‍ॅप स्टेटसवर लोनची जाहिरात पाहिली. कार लोनची गरज असल्यामुळे साहिल गाढे याने महेश चव्हाण यास संपर्क साधून कागदपत्रे पाठविली होती.

Jalgaon News
SAAM Sting Operation: आंबा कृत्रिमरित्या कसा पिकवतात? कोणतं केमिकल वापरतात बघा; स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

फाइल अडकल्याचा बहाणा

महेश चव्हाण याने तुझी फाइल मुंबई कार्यालयात पाठवली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पूजा चव्हाण नावाच्या महिलेने साहिल गाढे याला दूरध्वनी करून तुमचे सिबील रेकॉर्ड खराब असल्यामुळे तुम्हाला लोन मिळणार नसल्याचे सांगितले. लोनची आवश्यकता असल्यास सिबील रेकॉर्ड वाढवून दिला जाईल. त्यासाठी प्रोसेस फी, फाइल मंजुरी, ऑनलाइन जीएसटी, आयटीआर आदी कारणे सांगून गाढे याच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपये ऑनलाइन उकळले. तरीही लोन मंजूर होत नसल्याने फसवणूक झाल्याची साहिल गाढे याची खात्री झाली. याबाबत गाढे याने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Jalgaon News
Beed Land Scam: जमीन घोटाळा; अतिक्रमणे, परस्पर हस्तांतर प्रकरणी समिती गठीत

सायबरची कामगिरी

गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून सायबर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक लीलाधर कानडे, विद्यमान निरीक्षक अशोक उतेकर, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी, स्वाती पाटील, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, गौरव पाटील आदींनी मीरा भाईंदरला जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले व २१ लाख ९० हजार रुपये हस्तगत केले. जप्त रक्कम पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते गाढे यांना परत करण्यात आली. निरीक्षक अशोक उतेकर व सहकारी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com