Shirdi News: महसुलमंत्र्यांच्या घरावर धडकणार लाल वादळ; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लॉंगमार्च

महसुलमंत्र्यांच्या घरावर धडकणार लाल वादळ; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लॉंगमार्च
Shirdi News Farmer
Shirdi News FarmerSaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : शेतकरी आणि सामान्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले (Akole) येथून महसूल व दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या लोणी गावापर्यन्त येत्या २६ तारखेला किसान सभा लाॅन्ग मार्च काढणार आहे. २६ एप्रिलला अकोले येथून सुरू होणार मोर्चा २८ एप्रिलला महसूलमंत्र्यांच्या घरावर धडकणार आहे. (Tajya Batmya)

Shirdi News Farmer
Nandurbar News: इतर देशापेक्षा भारतात पेट्रोल स्वस्त; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

नाशिक ते मुंबई लॉंगमार्चच्या वेळी देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या (farmer) नावे करण्यासाठी कायदा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याचा मसुदा मांडण्यासाठी अद्याप कुठलीही हालचाल नाही. तसेच वनजमिनी संदर्भात समिती बनवली होती. मात्र त्या समितीकडूनही अद्याप कुठल्याही हालचाली न झाल्याचा किसान सभेचे म्हणणे आहे. यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या गावापर्यंत किसान सभा लॉंग मार्च काढेल. यात देवस्थान, गायरान, वनजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात. दुधाच्या संदर्भात आयात धोरणाला विरोध तसेच मागच्या सरकारने दुधाच्या FRP साठी बनवलेली समिती पुनर्जीवित करावी. बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम योजना सुरू करावी. यासह इतर काही मागण्या केल्‍या जाणार आहेत.

Shirdi News Farmer
Bribe Trap: महिला तलाठीने घेतली वीस हजाराची लाच; एसीबीच्‍या सापळ्यात अटक

असा असेल लॉंगमार्च

अकोले ते लोणी असा ५२ किलोमीटर लॉंगमार्च असणार आहे. यात २६ एप्रिलला राज्यभरातून शेतकरी आणि किसान सभेचे कार्यकर्ते अकोले (जि. अहमदनगर) येथे जमतील. यानंतर लॉंगमार्चची लोणीकडे मार्गक्रमण होईल. रात्री संगमनेरजवळ पहिला मुक्काम होवून दुसऱ्या दिवशी पुन्‍हा मोर्चाला सुरवात होईल. तिसऱ्या दिवशी निमगाव जाळी येथून लोणीकडे प्रयाण आणि दुपारपर्यंत लॉंगमार्च महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी धडकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com