Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani : परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे मोठे नुकसान

Parbhani News : सातत्याच्या पावसाने मोठे नुकसान होत आहे. प्रामुख्याने शेतातील पिकांचे नुकसान होत असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून खर्च देखील निघणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Rajesh Sonwane

विशाल शिंदे 
परभणी
: राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच परभणी जिल्ह्यातील शिर्शी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला पिके बेचिराख झाली आहेत. काढणीला आलेल्या भाजीपाला पावसामुळे खराब होत आहे. 

परभणी जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. यातच पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतांमध्ये पाणी साचले असल्याने पिके सडू लागली आहेत. तर जिल्ह्यातील शिर्शी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरात लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

पुरामुळे फुलकोबी खराब 

केदार आणि माधव सोपने यांनी मेहनतीने उभारलेली फुलकोबीची शेती अवघ्या काही तासांच्या पावसात नष्ट झाली. एक एकर शेतीवर अंदाजे ५० हजारांचा खर्च करत त्यांनी फुलकोबी तयार केली होती. जी आता तोडणीसाठी तयार होती आणि बाजारात चांगल्या भावाने विकली जात होती. मात्र, अचानक आलेल्या पुरामुळे पिक नासून गेले आणि त्यातून मिळणारा सुमारे दीड लाख रुपयांचा नफा शेतकऱ्यांच्या हातचा गेला. 

नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी नाही 
तर पावसामुळे नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने दुर्गंधीही पसरली आहे. नुकसानीनंतर चार दिवस उलटूनही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांची भाजीपाला व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे याचा पंचनामा करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar : अंत्यविधीसाठी जागा मिळेना; नातेवाईकांनी मृतदेह आणला तहसील कार्यालय आवारात

Jacqueline Fernandez : २०० कोटींच्या प्रकरणात जॅकलीनला कोर्टाचा झटका

Chanakya Niti: फक्त ५ गोष्टी करा फॉलो अन् बना करोडपती; चाणक्यांचे सीक्रेट

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस

गोव्याची खास सर्व्हिस आता अलिबागमध्ये लवकरच; पर्यटक खुश, नेमकी कोणती सेवा सुरू होणार?

SCROLL FOR NEXT