Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : रब्बीच्या पंचनाम्यात टाळाटाळ; विमा कंपनीकडे तब्बल ७० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

Parbhani News : यंदाच्या पावसाळ्यात ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाली. त्यामुळे नदी, नाले कोरडे राहिले. रब्बी हंगामातील पेरणीही शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनीच केली

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप व रब्बी हंगामातील (Parbhani) पिकांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना नुकसानीचा पंचनामा करण्यास मात्र (Crop Insurance) टाळाटाळ केली जात आहे. असे असले तरी तब्बल ७० हजार शेतकऱ्यांचा तक्रारी विमा कंपनीकडे आल्या आहेत.  (Live Marathi News)

यंदाच्या (Rain) पावसाळ्यात ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाली. त्यामुळे नदी, नाले कोरडे राहिले. रब्बी हंगामातील पेरणीही शेतकऱ्यांनी (Farmer) ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनीच केली. त्यामुळे किमान यंदा १ लाख ५० हजार हेक्टर पडीक राहील; अशी भीती निर्माण झाली होती. त्यातच राज्य शासनाकडून जिल्ह्यात ५२ महसूल मंडळांपैकी ३९ महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. मात्र २७ व  २८ नोव्हेंबरला परभणी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील तूर, कापूस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांना मदतीची आस 

अवकाळी पावसामुळे परभणी जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या पंचनाम्यामध्ये ५७ हजार हेक्टर क्षेत्रावरील (Crop Insurance Company) पिकांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. तर दुसरीकडे ६९ हजार ३०९ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन व ऑफलाइन पीक नुकसानीच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नजरा आता मदतीकडे लागल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

Gopinath Munde Legacy Controversy: धनंजयने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा,भुजबळांच्या वक्तव्यामुळे वादाचा भडका

SCROLL FOR NEXT