papaya rate increased in nandurbar saam tv
ऍग्रो वन

Papaya Rate Hike : नंदुरबारमध्ये पपई उत्‍पादक शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण, जाणून घ्या नवा दर

व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे सुधारित दर ठरविण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 7 हजार हेक्टर क्षेत्रावर पपई लागवड करण्यात आली आहे. यावर्षी हंगामाच्या सुरवाती पासून दर कमी असल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता. उत्तरेकडील राज्यात पपईला मागणी वाढल्याने पपईच्या दरात वाढ झाली आहे. (Maharashtra News)

सुरवातीला पपईला चांगला दर मिळाला होता. त्यानंतर हा दर 4 ते 5 रुपये प्रतिकिलो पर्यंत खाली आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता. या दरात पपईचा उत्पादन खर्च निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता शेवटच्या टप्प्यात पपई उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे सुधारित दर ठरविण्यात आला आहे. पपईला 8 रुपये 60 पैसे दर निश्चित करण्यात आला आहे. पपईचे दर वाढल्याने (papaya rate increased in nandurbar) शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पपई दरात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

Couple Viral Video : पुण्यात धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, मुलगी पेट्रोल टाकीवर बसली अन्.... प्रेमीयुगुलांचे प्रेम उतू

Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT