Watermelon Price Saam tv
ऍग्रो वन

Watermelon Price: टरबूज अवघे ८० पैसे प्रति किलो; तीन टन विक्रीनंतर शेतकऱ्याची ४५६० रुपयांची पदरमोड

कलिंगड अवघे ८० पैसे प्रति किलो; तीन टन विक्रीनंतर शेतकऱ्याची ४५६० रुपयांची पदरमोड

भारत नागणे

पंढरपूर : कांद्यानंतर आता टरबूजचे दर कोसळले आहेत. करमाळा तालुक्यातील (Pandharpur) बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या (Farmer) शेतकऱ्याला तीन क्विंटल टरबूज विक्रीनंतर अवघे ३४०० रुपये मिळाले आहेत. अवघ्या ८० पैसे प्रति किलो दर मिळाला आहे. (Live Marathi News)

बिटरगाव वांगी (पंढरपूर) येथील रामभाऊ रोडगे यांची तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरावर टरबूजची लागवड केली आहे. त्यांना यासाठी एक लाख २० हजार रुपयांचा खर्च आला आहे. यातील तीन टन टरबूज विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. तीन टन टरबूज काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे साडेचार हजार रुपये, हमाली ९६० रुपये असा एकूण सात हजार ९६० रुपये खर्च आला.

विक्रीनंतर साडेचार हजाराची पदरमोड

विक्रीसाठी आणलेले टरबूजची (Watermelon) पट्टी केवळ ३४०० रुपये झाली. त्यामुळे उत्पादन खर्च तर मिळालाच नाही. उलट नुकसान सोसून घरी परतावे लागले. तीन टन टरबूजचे ३ हजार ५०० मिळाले असले; तरी भाडे आणि मजूरीसाठी त्यांना ४ हजार ५६० रूपयांची पदरमोड करावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT