Pandharpur News Saam tv
ऍग्रो वन

Pandharpur News : पंढरपूर तालुक्यात पुरेसा पाऊस नाही; पेरणीची कामे रखडली

पंढरपूर तालुक्यात पुरेसा पाऊस नाही; पेरणीची कामे रखडली

भारत नागणे

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. नद्यांना महापूर आला आहे. शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र दुसरीकडे पंढरपूर (Pandharpur) व परिसरात अद्यापही पाऊस झाला नाही. पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने खरीप पेरणी रखडली आहे. (Live Marathi News)

राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. मात्र पंढरपुरात पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे. जून- जुलै कोरडा गेला आहे. अद्याप परिसरात मोठा पाऊस झाला नसल्याने विहिरी व विंधन विहिरीची पाणी पातळी खोल गेली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही; तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पेरणीचा खर्च गेला वाया 

शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणीसाठी दोन महिने झाले शेतीची मशागत करून ठेवली आहे. दरम्यान पाऊस झाला नसल्याने मका, बाजरी, तुर आदी पिकांची पेरणी झाली नाही. शेती रिकामी पडली आहे. पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दोन‌ महिन्यांपासून पाऊस नसल्याने पेरणीचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. त्यातच चार्याचा ही प्रश्न‌ गंभीर झाल्याने शेतकऱ्यांचे पशुधन अडचणीत आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT