शेतकऱ्यांना धमकी देणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश  Saam Tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना धमकी देणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश

कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एकदा साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. उगावमध्ये उधारीच्या वसुलीसाठी गुंडांचा वापर करत शेतकऱ्यांना (Farmer) धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना तातडीनं रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तर संबंधित महिला आरोपीला देण्यात आलेला राज्य सरकारचा (State Government) शेती मित्र पुरस्कारही गैरप्रकार आढळल्यास रद्द करण्यात येणार आहे. कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना धमकी आणि शिवीगाळ करणाऱ्या गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून थकीत उधारी वसूल करण्यासाठी चक्क गुंडांच्या टोळीला सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक उगावमध्ये समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातचं निफाड तालुक्यातील उगावमध्ये ही घटना घडली. गुंडांच्या धमकीमुळे दहशतीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं. साम टिव्हीने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर अखेर प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आहे. संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना तातडीनं रद्द करण्याचे आणि महिला मालकाला राज्यसरकारकडून जाहीर झालेल्या शेती मित्र पुरस्काराची चौकशी करून गैरप्रकार आढळल्यास पुरस्कार मागे घेण्याचे आदेश कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

कृषी विभागाप्रमाणेचं पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर घेत शेतकऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या गुंडाला अटक केलीय, तर कृषी सेवा केंद्राच्या मालक पती-पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार पतीपत्नीचा शोध पोलीस घेतायत. दरम्यान साम टिव्हीने संबंधित कृषी सेवा केंद्राचे मालक सुनील कासुर्डे यांच्याशी संपर्क करून आरोपांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

गुंडांच्या धमकी आणि दहशतीमुळे संबंधित शेतकरी इतक्या दहशतीखाली होते, की गुंडांच्या भीतीनं 3 दिवस ते घराबाहेरही पडले नाहीत. मात्र साम टिव्हीने या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहत त्यांना धीर दिला. गावातले अन्य शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. मात्र तरीही आपबिती सांगतांना या शेतकऱ्यांच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची शेतकऱ्यांनीही केलीय.

संतापजनक बाब म्हणजे उधारी वसुलीसाठी गुंडांचा वापर करणाऱ्या कृषी सेवा केंद्राच्या महिला मालकाला राज्यसरकारचा शेती मित्र पुरस्कार जाहीर झालाय. त्यामुळे नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे राज्यसरकारचे पुरस्कार दिले जातात, हा देखील प्रश्न उपस्थित होत असून आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर दिवाळी ऑफरचे मेसेज येतात? सावधान, अशी घ्या काळजी, अन्यथा...VIDEO बघा

Maharashtra Live News Update: राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे उद्या पुण्यात

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धन धन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT