Solapur Krushi Utpanna Bazar Samiti : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. मागील दोन दिवसांपासून कांद्याचा दर वाढला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कमाल ३३०० रुपये दर होता. मंगळवारी पांढरा कांदा ५१०० रुपये आणि लाल कांदा ४५०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. (Maharashtra News)
कांद्यासाठी सोलापूर बाजारपेठ देशात प्रथम क्रमांकावर आहे. डिसेंबरनंतर जवळपास १००० ट्रक कांद्याची आवक असते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात दररोज ८०० ते १००० ट्रक आवक होती. त्यामुळे गाड्या बाहेर काढण्यासाठी कांदा लिलाव बंद ठेवण्याची वेळ आली होती, त्यानंतर कांद्याचा दर पडल्याने शासनाकडून अनुदान मिळाले.
सध्या शंभरहून अधिक ट्रकची आवक झाली आहे. सरासरी दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर पुन्हा कांद्याचा दर वाढला आहे. येणाऱ्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि नंतरच्या काळात पुन्हा पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी (farmers) उशिराने कांद्याची लागवड केली आहे. तो माल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.