Onion Grovers, Kanda Anudan, Maharashtra Saam TV
ऍग्रो वन

Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

अर्जासोबत काेणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते देखील मंडळाने कळविले आहे.

Siddharth Latkar

Kanda Anudan News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (सन २०२२ - २०२३ या वर्षात) प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी तीन एप्रिलपासून २० एप्रिल २०२३ पर्यंत (Kanda Anudan Application Last Date) शेतक-यांनी अर्ज करावेत असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. (Breaking Marathi News)

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजारमध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे एक फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२ -२०२३ चा लाभ घेण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत

विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत,ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक आहे.

अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक ,नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे विहित वेळेत सादर करावेत असे पणन संचालक यांनी कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT