Satara : राज्यात सातारा अव्वल; डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा 68 कोटी 9 लाखांचा शेतक-यांना लाभ

शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
dr panjabrao deshmukh interest subsidy scheme, satara
dr panjabrao deshmukh interest subsidy scheme, sataraSaam Tv

Satara News : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (dr panjabrao deshmukh interest subsidy scheme) राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात म्हणजे सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. ही योजना राबविण्यात सातारा (satara) जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. (Maharashtra News)

dr panjabrao deshmukh interest subsidy scheme, satara
Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्वूपर्ण निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे.

पीक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

dr panjabrao deshmukh interest subsidy scheme, satara
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

शासन निर्णयाप्रमाणे सन 2021-2022 वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना 0 टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळत आहे. हे या योजनेचे खास वैशिष्ठ्य आहे.

dr panjabrao deshmukh interest subsidy scheme, satara
Shirdi Sai Baba : साई भक्तांसाठी मोठी बातमी; शिर्डीतील मंदिर राहणार रात्रभर खुले, जाणून घ्या कारण

याेजनेंतर्गत 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा लाभ

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात स्टेट पुल (सर्वसाधारण) मधून 3 लाख 13 हजार 188 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयांचा लाभ, जिल्हा नियोजन समिती (सर्व साधारण) योजनेमधून 81 हजार 310 शेतकऱ्यांना 12 कोटी 99 लाख 99 हजार 985 , समाज कल्याण विभाग (विशेष घटक योजन) मधून 933 शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांचा असे एकूण 3 लाख 95 हजार 431शेतकऱ्यांना 68 कोटी 9 लाख 99 हजार 985 रुपयांचा या योजनेंतर्गत लाभ देवून ही योजना राबविण्यात राज्यात सातारा जिल्हा अव्वल ठरला आहे.

Edited By : Siddharth Lakar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com