<div class="paragraphs"><p>आदिवासींच्या जमीनी हडपल्याप्रकरणी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी बुलडाण्यातील शेत जमिनींची पाहणी केली. स्वाभीमानीचे प्रशांत डिक्कर यावेळी उपस्थित होते&nbsp;</p></div>

आदिवासींच्या जमीनी हडपल्याप्रकरणी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी बुलडाण्यातील शेत जमिनींची पाहणी केली. स्वाभीमानीचे प्रशांत डिक्कर यावेळी उपस्थित होते 

 

Sanjay Jadhav

ऍग्रो वन

आदिवासींच्या शेतजमीनी हडपल्याचा प्रकार उघडकीस

संजय जाधव

बुलडाणा : संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासींच्या शेकडो एकर शेतजमिनी गैरआदिवासींनी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासियांच्या अज्ञानाचा ग़ैरफ़ायदा घेत तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या संगनमताने ह्या शेत जमीनी इतर गैर आदिवासिंच्या नावावर करुन दिल्याचा प्रकार समोर येतो आहे.

गेल्या १० वर्षांपासून आदिवासी नागरिक संग्रामपुर व जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यल्याचा उंबरठा झिझवत आहेत. मात्र प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत होते. हा प्रश्न स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या समोर आला तेव्हा विदर्भ युवा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यानी विभागीय आयुक्तांकडे या जमीन घोटाळ्याची लेखी तक्रार केली व चौकशी करण्याची मागणी केली. या तक्रारी वरुन आयुक्तांनी जिल्ह्या प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. यावरून जिल्ह्याधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने संग्रामपुर तालुक्यातील चिचारी गाव शिवारातील आदिवासी नागरिक व त्यांच्या शेत जमिनिची पाहणी करुन चौकशी केली आहे.

या समितीमध्ये दोन उपविभागीय अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांनी शेतजमीनींना भेट दिली. तक्रारदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर उपस्थित होते. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख चौकशी करीता चिचारी या गाव शिवारात घटना स्थळी दाखल झाले होते.

आदिवासींच्या जमिनी हडपणाऱ्यावर कारवाई करुन शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे युवा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी केली. 10 वर्षांपूर्वी रजिस्टर दस्तऐवज न करता परस्पर शेकडो एकर जमिनी हडपल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे.तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन परस्पर जमिनी विकल्याचा चिचारी येथिल शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mothers Day Movie: यंदाचा मदर्स डे करा स्पेशल; आईसोबत पाहा हे चित्रपट

Today's Marathi News Live : गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये ३.१५ वाजता जाणवले भूकंपाचे धक्के

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तू खरेदी करणं मानलं जातं शुभ

Junnar News | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी!

Cheesecake Recipe : घरातील थोड्याशा सामानापासून बनवा चीज केक; मोठ्यांसह लहान मुलांनाही आवडेल

SCROLL FOR NEXT