Nashik News Saam tv
ऍग्रो वन

Nashik News : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन एकर पेरूची बाग तोडली; शेतकऱ्याचे नुकसान

Nashik News : कमी पावसामुळे राज्यातील सर्वच भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. नद्यांना पाणी आले नसल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाण्याचे स्रोत आटले आहेत.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पाऊस कमी झाल्यामुळे यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे पाणी टंचाईसह शेतीत लागवड केलेल्या (Nashik) पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पाणी नसल्याने पेरूच्या पिकांना पाणी देता येणे शक्य नसल्याने शेतकऱ्याने (Farmer) दोन एकरावरील पेरूची बाग तोडून टाकली आहे.

कमी पावसामुळे (Rain) राज्यातील सर्वच भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. नद्यांना पाणी आले नसल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाण्याचे स्रोत आटले आहेत. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यात पाहण्यास मिळत असून नाशिक जिल्ह्यात देखील यंदा दुष्काळी (Drought) परिस्थिती असल्यामुळे नदी, नाले, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहे. यामुळे त्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शेतात असलेल्या बागा तसेच पिकांना पाणी देता येत नाही. तर आता पावसाळ्यापूर्वी लागवड केल्या जाणाऱ्या पिकांचे क्षेत्र देखील घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पेरूची बॅग काढली 

येवला तालूक्यातील शेतकरी हरिभाऊ लासुरे यांनी दोन एकरात पेरु बागेची लागवड केली होती. मात्र पेरुला अपेक्षित दर नाही, त्यातच बागेला देण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने अखेर नाईलाजास्तव लासुरे यांनी संपुर्ण दोन एकर पेरु बाग तोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT