Pomegranate
Pomegranate Saam tv
ऍग्रो वन

Pomegranate Crop : वातावरण बदलाचा डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकरी डाळींबाचे उत्पादन घेत असतात. सध्या बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून डाळींबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

सध्या राज्यात पाऊस होत आहे. खरीप हंगामासाठी पावसाची आवश्यकता असून काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. तर काही ठिकाणी अद्याप पेरण्या बाकी असल्याने पाऊस गरजेचं आहे. मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अल्प पाऊस अशी परिस्थिती असल्याने ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने तेथे आद्रता वाढल्याने (Pomegranate) डाळींबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असून फळ खराब होऊन फळकुज होऊ लागली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) हस्त बहार धरल्याने त्यांचे डाळिंब सध्या बाजार विक्रीला येत असले, तरी बागांमधील फळावर तेल्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. असे असले तरी बाजारात डाळींबाचे उत्पादन कमी असल्याने डाळींबाला ७० ते १०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बाजारात चांगला दर मिळत असल्याने खर्च निघून जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : चंद्रपूरमध्ये झालेल्या गोळीबारात मनसेचे जिल्हाप्रमुख जखमी

Sikandar Movie : भाईजानच्या चित्रपटात 'कटप्पा'ची एन्ट्री, 'सिंकदर'मध्ये सलमान खानसोबत प्रसिद्ध खलनायकही दिसणार

Nanded News: भाजप आमदाराविरोधात धर्माबादकर आक्रमक; कडकडीत बंद! कारण काय?

Gondia Accident: लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायला जाणाऱ्या भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

Team India's Victory Parade Live: टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज!

SCROLL FOR NEXT