Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : दुष्काळी परिस्थितीत आल्याचे उत्पादन; शेतकऱ्याला बांधावरच मिळतोय चांगला दर

Nashik Manmad News : सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्याला दुष्काळाशी मोठा सामना करावा लागत आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या पुर्व भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे (Nashik) सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. अशा परिस्थितीत देखील नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथील (Farmer) शेतकऱ्याने आल्याची लागवड करत चांगले उत्पादन घेतले आहे. यातून या शेतकऱ्याच्या हाती बऱयापैकी भांडवल आले आहे. (Breaking Marathi News)

सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस (Rain) झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्याला दुष्काळाशी (Drought) मोठा सामना करावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना देखील न्यायडोंगरी येथील शेतकरी शशीकांत पाटील यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर एक एकर क्षेत्रात (Ginger) आल्याची (अद्रक) लागवड केली होती. सध्या त्यांनी अद्रक काढणीला सुरवात केली आहे. एक एकरमधून ९० क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांधावरच मिळतोय चांगला दर 

अद्रक विक्रीसाठी या शेतकऱ्याला मार्केटमध्ये जाण्याची आवश्यकता नसून व्यापाऱ्याकडून शेताच्या बांधावरच आल्याची खरेदी केली जात आहे. त्याला ९५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला असून व्यापारी जागेवरच माल खरेदीसाठी येत असल्याने दुष्काळी परिस्थितीत शशीकांत शिंदे यांना त्यातून चांगला फायदा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

SCROLL FOR NEXT