Papaya Crop Saam tv
ऍग्रो वन

Papaya Crop : अज्ञात माथेफिरूने तोडले पाचशेहून अधिक पपईचे झाडे; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Nandurbar News : प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर असून घटने प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शेतकऱ्याने शेतात पपईची लागवड केली होती. भर उन्हाळ्यात आणि पाणी टंचाईचे सावट असताना देखील पपईला जगविले. परंतु एका माथेफिरूने शेतात जाऊन पाचशेहून अधिक पपईची रोपे कापून टाकली आहेत. हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ईस्लामपुर येथे घडला आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील इस्लामपूर गावातील पियुष बेदमुथा या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पियुष बेदमुथा हे आपल्या शेतात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार आढळून आला आहे. अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याच्या शेतातील पपईची झाडे तोडून फेकली आहेत. तसेच शेतातील मजुरांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे देखील नुकसान करून पाण्याचे नऊ नळ देखील तोडले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (farmer) नाराजीचा सुर असून घटने प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. 

लाखो रुपयांचे नुकसान 

पियुष बेदमुथा हा शेतकऱ्याने शेतात पपईची (Papaya Crop) लागवड केली असताना आता त्याला फळ धारणा होण्यास सुरवात झाली होती. मात्र एकाने झाडे कापून टाकली आहेत. शेतातील ५५० पपईची झाडे तोडून लाखोचे नुकसान करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधी देखील शहादा तालुक्यात अशाच पद्धतीने शेतीच्या नासधुसीचे प्रकार समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT