Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती; दुष्काळी परिस्थितीमुळे दरातही वाढ

Nandurbar News : ज्वारी आणि मकाचे पीक पूर्ण वाढ न होताच करपल्याने चाऱ्याच्या उत्पादनातही घट आली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात विदारक परिस्थिती असून पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Maharashtra News)

यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात पावसाच्या सरासरीची तूट मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यात ३१ ते ३७ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट असल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यासोबत गुरांच्या चाऱ्यासाठी ही पशुपालकांना मोठी फिरफिर करावी लागत आहे. ज्वारी आणि मकाचे पीक पूर्ण वाढ न होताच करपल्याने चाऱ्याच्या उत्पादनातही घट आली आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील पशुपालकांना खरीप हंगामातील ज्वारी आणि मका चाऱ्यासाठी फिरफिर करावी लागत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाऱ्याच्या दरातही वाढ 

पाऊस नसल्याने चाऱ्याची समस्या आहे. चार मिल्ने कठीण झाले असल्याने यावर्षी चाऱ्याची एक पेंढी १५ ते २० रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने पशुपालक समस्या वाढल्या आहेत. शिवारात ज्वारीच्या कापणीनंतर चारा गोळा करण्याची लगबग दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT