Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : चाऱ्याची समस्या बनली अधिक बिकट; अवकाळी पावसाने चारा झाला खराब

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे चारा खराब झाला आहे. यामुळे पशुपालक (Farmer) शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिकांप्रमाणे खराब चाऱ्याचाही पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना सरकारने दिलासा द्यावा. (Nandurbar) शासकीय स्तरावरून चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज माजी मंत्री आमदार ऍड. के. सी. पाडवी यांची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे शेती पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारा पावसामुळे खराब झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावर जगवावीत कशी? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करत आहे. मात्र पशुपालक शेतकऱ्यांचा विचार कुठेही होत नसल्याचे दिसून येत आहे. पिकांप्रमाणेच खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे प्रशासनातील अधिकाऱ्यांना या विषयातील गांभीर्य नसल्याचे ही दिसून येत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पशुपालक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून चारा खराब झालेल्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी मदत करावी त्याचप्रमाणे खराब झालेल्या चाऱ्याचेही पंचनामे करण्यात यावे; अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांनी केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या, प्रशासनाने दिली 50 हजारांची मदत

Harmful Habits : तुम्हीही एकाच दमात पाण्याची बाटली संपवताय? 'ही' छोटीशी चूक बेतेल जीवावर

Prostitution Racket : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्...

Dahi Handi Horoscope : आज या राशींना मिळू शकतो आर्थिक लाभ! दहीहंडी आणि शिक्षक दिनाचा योग; पंचांगात काय आहे खास? वाचा

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT