Strawberry farming
Strawberry farming saam tv
ऍग्रो वन

Nandurbar: स्ट्रॉबेरी शेती वाढली; उत्‍पादनही चांगले, पण करावी लागतेय रस्‍त्‍यावर विक्री

दिनू गावित

नंदुरबार : सातपुडा अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा परिसरात यंदा ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरीही यामध्ये सहभाग घेत असून पोषक वातावरणामुळे उत्पादनही चांगले येत आहे. मात्र दुर्गम भाग असल्याने मार्केटची सुविधा उपलब्ध नसल्याने कमी दराने स्ट्रॉबेरीची (Strawberry Farming) विक्री करावी लागत आहे. (nandurbar Strawberry farming increased in district but it has to be sold on the road)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तोरणमाळ आणि वालंबा, दाब या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास गेल्या २००७ पासून स्ट्रॉबेरी पीक लागवडीची सुरुवात झाली होती. यंदा तोरणमाळ येथे तीन शेतकरी (Farmer) तर वालंबा आणि दाब परिसरात जवळपास ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. चवदार आणि उत्कृष्ट दर्जाच्या स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार अतिदुर्गम भाग मागासलेला जिल्हा अशी ओळख असणाऱ्या भागातही शासनाच्या कृषी विभागाच्या (Department of Agriculture) मार्गदर्शनातून शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करून आपले जीवनमान सुधारण्याचा ध्यास ठेवत आहे. दिवसेंदिवस या परिसरात तरुण शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे आकर्षित होत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

वालंबा हा परिसर डोंगर-दर्‍याचा दुर्गम भाग असल्याने येथील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या जमिनी सपाट करून सुरुवातीला साध्या पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करायला सुरुवात केली होती. परंतु कृषी विभागाच्या मदतीने त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मल्चिंग पेपर व ड्रीपद्वारे पाणी देण्याची सोय उपलब्ध करून येथील शेतकऱ्यांना स्टोबेरी शेतीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.

मार्केट नसल्‍याने रस्‍त्‍यावर विक्री

वालंबा परिसरात स्टोबेरी शेतीसाठी पोषक वातावरण असून गेल्या काही दिवसात या ठिकाणी दवबिंदू गोठून हिमवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले होते. वर्षानुवर्षे या परिसरात स्टोबेरी शेतीकडे तरुण शेतकरीही आकर्षित होत असून यंदा वालंबा गावातील संपत पाडवी, डेड्या पाडवी, दिलीप पाडवी या तरुण शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा अधिक खर्च करून स्ट्रॉबेरी शेतीची लागवड केली आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेल्या स्टोबेरी पिकातून चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे. या परिसरात विक्रीसाठी मोठा मार्केट उपलब्ध नसल्याने सध्या येथील शेतकऱ्यांद्वारे अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर शंभर ते दीडशे रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

SCROLL FOR NEXT