Nandurbar Shiv Sena Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds : बोगस बियाणांची विक्री सुरूच; विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक

Nandurbar News : खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी सुरु आहे. यात काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे येत आहे. परंतु कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असून यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी सुरु आहे. यात काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. दरम्यान (Nandurbar) नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश सीमावर्ती भागात असल्याने नंदुरबारमध्ये गुजरात व मध्य प्रदेशातून कापसाचे बियाणे विक्रीसाठी आणले जातात. मात्र यातील काही बियाणे हे बोगस निघत असून (Farmer) शेतकऱ्यांची यात फसवणूक होत असल्याने नुकसान होत आहे. यावर कृषी विभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून आता बियाणे घेऊन पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी बोगस बियाणांची विक्री सर्रास होत असते. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने (Bogus Seeds) बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली नाही; तर आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर वाहतूक कोंडी

२० वर्षे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकारणात शोककळा

Milk Cake Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरीच बनवा मऊ, स्वादिष्ट मिल्क केक; वाचा सोपी रेसिपी

माजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक मोठा धक्का; आता विश्वासू नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

Hair Care: केस दाट आणि मजबूत हवे आहेत? रोज खा 'हे' ७ पौष्टिक सुपरफूड्स, केस होतील कंबरेपर्यंत लांब

SCROLL FOR NEXT