Shruti Vilas Kadam
२ लिटर फुल-फॅट दूध, २ कप साखर, २ टेबलस्पून लिंबाचा रस किंवा फिटकरीचे पाणी (दूध फाडण्यासाठी), १ टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून तूप आणि सजावटीसाठी पिस्ता-बदाम.
जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. दूध उकळल्यानंतर मंद आचेवर सतत ढवळत अर्ध्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
लिंबाचा रस किंवा फिटकरीचे पाणी थोडे-थोडे घालत दूध हलकेच फाडा. पूर्ण पनीर होणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे मिल्क केकला खास टेक्स्चर मिळते.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. साखर विरघळल्यानंतर मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत सतत ढवळत शिजवा.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि तूप घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करा.
तुपाने ग्रीस केलेल्या ट्रे किंवा डब्यात तयार मिश्रण ओता. वरून पिस्ता आणि बदामाचे काप पसरवा. ४ ते ५ तास किंवा पूर्णपणे सेट होईपर्यंत ठेवा.
मिल्क केक पूर्णपणे सेट झाल्यावर चौकोनी किंवा डायमंड आकारात कापा. थंड किंवा रूम टेंपरेचरला सर्व्ह करा. हा गोड पदार्थ सण, वाढदिवस किंवा खास प्रसंगी सर्वांना नक्की आवडेल.