Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : एक रुपयात पिक विम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद; कृषी विभागाचा गावोगावी दौरा

Nandurbar News : पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी याकरिता सरकारने एक रुपयात पीक विमा काढण्याची योजना आणून पिकांना संरक्षण कवच दिले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यासाठीचा अर्ज भरण्यासाठी आता दहा- बारा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. याकरिता कृषी विभागाचे गावोगावी दौरे सुरु असून पीक विम्यात सहभागी होण्यात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. 

शेतात लागवड केलेल्या पिकांचे पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी याकरिता सरकारने एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) काढण्याची योजना आणून पिकांना संरक्षण कवच दिले आहे. यंदा देखील खरीप हांगाची पीक विमा योजना सुरु झाली असून याच्या अर्ज भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. पिक विमा कापूस, सोयाबीन, ज्वारी, दादर, भात, मका अशा अनेक पिकांच्या समावेश आहे. मात्र मिरचीला या पीक विम्यातून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अल्पसा प्रतिसाद असू शकतो असे देखील शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

गावोगावी जाऊन जनजागृती 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने पेरणीला वेग आला आहे. मात्र पिक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांच्या कल दिसत नसल्याने कृषी विभागाच्यावतीने आता जनजागृती करण्यात येत आहे. एक रुपयात पिक विमा काढण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर, रिक्षा यांच्यावर गावोगावी जाऊन प्रचार प्रसार केला जात आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून एक रुपयात पिक विमाला अल्पसा प्रतिसाद दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढावा यासाठी चांगली शक्कल कृषी विभागाकडून लढवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

SCROLL FOR NEXT