Kalyan News : बोगस आरपीएफ जवानाच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर; भरतीसाठी एकाने घेतले लाखो रुपये

Kalyan News : रोहन हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील माउली वस्ती कानगावचा राहणारा आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 

कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये आरपीएफचा युनिफॉर्म घालून झोपलेल्या एका तरुणाकडे टीसीने ओळखपत्र मागितले. टीसीने त्याचे ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. या बोगस आरपीएफ जवानाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रोहन उतेकर असे या तरुणाचे नाव असून त्याच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा झाला. एका व्यक्तीने आरपीएफमध्ये भरती करण्याच्या नावाखाली शेकडो तरुणांकडून पैसे घेऊन फसवणूक केली. इतकेच नव्हे तर काहींना आरपीएफचा ड्रेस आणि नकली प्रमाणपत्र दिल्याचे देखील उघड झाले.

Kalyan News
Beed News : वाळू प्रकरणी तलाठ्यासह मंडळाधिकारी निलंबित; गोदापट्ट्यातून सुरु होता वाळूचा उपसा

मुंबई- चेन्नई एक्सप्रेस (Kalyan) कल्याणच्या दिशेने येत असताना एस- १ बोगीत एका सीटवर आरपीएफ जवान झोपला होता. टीसीने या आरपीएफ जवानाकडे त्याचे आयकार्ड मागितले. आयकार्ड पाहिल्यानंतर ते बनावट असल्याचे टीसीच्या लक्षात आले. टीसीने याची माहिती कल्याण आरपीएफ आणि कल्याण जीआरपीला (Railway Police) दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणाला कल्याण रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले. रोहन उतेकर असे त्याचे नाव आहे. रोहन हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील माउली वस्ती कानगावचा राहणारा आहे. राेहनच्या अटकेनंतर त्याचा चौकशी दरम्यान झालेल्या खुलासामुळे पोलीस देखील थक्क झाले.

Kalyan News
Dharashiv News : रानडुकराची तस्करीच्या आरोपात तरुणाला कोंडून ठेवत मारहाण; तरुण गंभीर जखमी

६ लाख देऊन बनला बोगस आरपीएफ 

रोहन एका व्यक्तीला भेटण्यासाठी मुंबईला आला होता. या व्यक्तीने रोहनकडून सहा लाख रुपये घेतले. तो रोहनला आरपीएफमध्ये  कामाला लावणार होता. रोहनसह त्याच्या आठ नातेवाईकांचे पैसे देखील त्या व्यक्तिला दिले आहे. रोहन याची त्या व्यक्तीशी अहमदनगर येथील एका खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या डायरेक्टरने करुन दिली होती. त्रिदल पाेलिस अकादमी नगरच्या डायरेक्टरने ही भेट घालून दिली होती. या डायरेक्टरने देखील सहा लाेकांचे पैसे दिले आहे. जवळपास १०० पेक्षा जणांकडून त्या व्यक्तीने आरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली पैसे उकळले आहे.

इतकेच नव्हे तर रोहन उतेकर याच्यासह काही तरुणांना कलकत्ता येथे नेऊन त्याची मेडीकल करण्यात आली. बिहार राज्यातील पटणा येथे तीन महिने ठेवून त्यांची ट्रेनिंगही घेतले. तरुणांनी आमची आरपीएफमध्ये भरती केव्हा होणार? अशी विचारणा केली असता तो त्यांना कोणत्या ना कोणत्या रेल्वे कार्यालयात घेऊन जायचा. परंतु नोकरी अद्याप लागली नव्हती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी या भामट्याचा शोध घेत तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com