ऊसतोड  
ऍग्रो वन

अन्यथा ऊसतोड बंद करणार; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

अन्यथा ऊसतोड बंद करणार; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

दिनू गावित

नंदुरबार : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढलेला खर्च तसेच बाजारात साखरेचे दर मागील वर्षापेक्षा जास्त आहेत. तरीदेखील चालू हंगामात मागील वर्षापेक्षा कमी ऊस दर देऊन कारखाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल व लुट करून साखर कारखानदार ऊस वाहतुकीचा खर्च व मजुरी देखील शेतकऱ्यांकडून वसूल करत असल्याचे चित्र आहे. यामुळ चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी २ हजार ७०० रुपये ऊस दर वाढवून द्यावा; अन्यथा ऊसतोड बंद करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. (nandurbar-news-Otherwise-the-cane-will-close-Warning-of-Farmers-Committee)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (farmer) अत्यंत कमी ऊसदर दिला आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार उसाच्या रिकवरीनुसार कारखान्यांनी दर देणे अपेक्षित असतानाही कारखान्यांकडून ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात साधारणता उसाची रिकव्हरी १०.४८ टक्के असून साखर कारखान्यांनी २९०० रुपये प्रति टन भाव देणे अपेक्षित असतानाही शहादा येथील सातपुडा तापी सहकारी साखर कारखान्याने २३०१ रुपये प्रति टन दर दिला आहे, तर नंदुरबार समशेरपुर येथील आयान शुगर कारखान्याने २३५० रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आहे. तर नवापूर (Navapur) आदिवासी साखर कारखान्याने २५२५ रुपये प्रति टन दर दिला आहे.

खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर नको

ऊस तोड व वाहतुकीचा वाढीव खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर न टाकता कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपये प्रति टन ऊस भाव देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शासन व लोकप्रतिनिधींनी रिकवरीच्या बाबतीत पारदर्शकता आणण्यासाठी समिती स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे (Pune) यांना शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आले आहे. पुढील आठ दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चालू हंगामातील सुरू असलेली ऊस तोड बंद करून आंदोलनाचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT