Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : पाऊस लांबल्याने ५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात; शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात दहा दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात मान्सून दाखल झाला असून अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र काही भागात थोडा पाऊस पडून नंतर पावसाने ओढ दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पाऊस लांबल्याने साधारण ५ हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके धोक्यात आहेत. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात दहा दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. जमिनीत ओलावा असल्याने जमिनीबाहेर कोम येऊन पिके उगवली आहेत. मात्र आता या पेरण्यांना पावसाची (Rain) गरज असून तब्बल 5 हजार हेक्टरवरच्या पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा जवळपास ४० अंश सेल्सिअस आहे. यातून जमिनीत ओलावा संपला असून टोचणी केलेल्या बियाण्याला धोका निर्माण होत आहे. कृषिपंपांची पाणी पातळी खालावली असल्याने बागायती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठीच दमछाक होत आहे. आगामी आठवडाभरात पाऊस न पडल्यास पेरणी केलेले बियाणे वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT