Farmer Saam tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांच्या जमिनींचा बेकायदेशीर वापर; शेतकरी कामगार संघर्ष समितीचे आमरण उपोषण

शेतकऱ्यांच्या जमिनींचा बेकायदेशीर वापर; शेतकरी कामगार संघर्ष समितीचे आमरण उपोषण

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतजमीनींचा बेकायदेशीर वापर झाला आहे. अशा प्रकार वापर करणाऱ्या सुझलॉन कंपनी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी (Farmer) कामगार संघर्ष समितीतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. (nandurbar news Illegal use of farmers lands)

अरुणाबाई रतन भिल व इतर २ शेतकरी यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन गट क्रमांक 193, 2 हेक्टर 45 आर एवढी सामुहिक मालकीची असून यात उषाबाई महादेव भिल हे सामाईक हिस्सेदार आहेत. सदर जमीन उपजिविकेचे (Nandurbar News) साधन आहे. परंतु शेतजमीनीचा वापर मागील 15 ते 16 वर्षापासून पवनऊर्जा निर्माण करणारी कंपनी सुझलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज कंपनी कोरेगांव पार्क पुणे यांनी कोणतीही परवानगी न घेता रस्ता व विजवाहक पोलसाठी वापरली आहे.

खोटे नकाशे बनविले

कंपनीने साधारण जमीन वापराबद्दल मूळ मालकाला कोणताही मोबदला दिलेला नाही. कंपनीची मनमानी व आर्थिक दादागिरीसमोर आपले प्रशासन विकले गेले आहे काय? सुझलॉन कंपनीचे कर्मचारी यांनी आपल्या महसुल प्रशासनाला सदर रस्ते हे आमच्या हद्दीत असल्याचे खोटे नकाशे बनवून आणले आहेत. यावर संबंधित उपोषणकर्त्यांनी भुमिअभिलेख कार्यालयाकडून सदर जमीनीची मोजणी करुन घेतली असता सदर जमीनीवर कंपनीने रस्ता पोल टाकल्याचे दिसत आहे. या जमिनीसंदर्भात कंपनीने बेकायदेशीररित्या गेल्या पंधरा वर्षापासून वापर केला आहे. याची भरपाई प्रत्येक वर्षाचे दोन लाख असे पंधरा वर्षाचे तीस लाख रुपये मिळावी; तसेच कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा; या मागणीसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

SCROLL FOR NEXT