तळोदा (नंदुरबार) : खरवड (ता. तळोदा) गावातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रकाश शिरसाट हे पुढे आले असून गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या शेतातील (Nandurbar News) कूपनलिकेच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवत आहे. त्यामुळे प्रकाश शिरसाट यांच्या या दातृत्वाची पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. (nandurbar news Farmers have been supplying water to the village for seven years)
(Nandurbar latest Marathi News)
खरवडची (ता. तळोदा) लोकसंख्या जवळपास एक हजार तीनशे असून गावाला काही वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन सरपंच जिजाबाई मोरे यांनी गावासाठी चार कूपनलिका मंजूर केल्या होत्या. परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांना पाणी लागले. त्या कूपनलिकांमध्ये नियमित वापरल्या जाणाऱ्या अश्वशक्तीचा विद्युत पंप टाकून गावातील घरापर्यंत पाणी पोचविण्यात आले. कालांतराने कूपनलिकांमधील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली. त्याला पर्याय म्हणून कूपनलिकांमध्ये सिंगल फेज विद्युतपंप टाकण्यात आले व त्या सिंगल फेज विद्युत पंपाद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात आला.
सार्वजनिक नळांचेही कनेक्शन
खरवड गावातील जवळपास ४५० घरांपैकी ३६० घरांना नळ कनेक्शन देत त्यातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तसेच गावाच्या चारही बाजूला चार ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले. जेणेकरून घरापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास सार्वजनिक नळांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होईल. प्रकाश शिरसाट स्वतः शेतकरी (Farmer) असून ते ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. गावातील पाण्याची समस्या त्यांना अवगत होती. त्यांनी स्वतःहून आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करीत पाण्याची समस्या निकाली काढली.
खरवड ग्रामस्थांना काही वर्षांपूर्वी कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागल होते. त्यामुळे ग्रामस्थांचे खूप हाल झालेत. ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी माझ्या शेतातील कूपनलिका समर्पित केली असून गेल्या सात वर्षांपासून ती कूपनलिका ग्रामस्थांची तहान भागवत आहे.
- प्रकाश शिरसाट, शेतकरी, खरवड.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.