Dhule News
Dhule NewsSaam tv

शेतात लपवून ठेवलेला आठ लाखांचा दारूसाठा जप्त

शेतात लपवून ठेवलेला आठ लाखांचा दारूसाठा जप्त
Published on

धुळे : साक्री तालुक्यातील शिवपाडा परिसरात चिंतामण मालचे या इसमाच्या शेतामध्ये लाखो रुपयांचा दारुसाठा लपवून ठेवण्यात आला होता. हा दारूचा साठा पोलिसांनी (Police) जप्‍त केला आहे. (dhule news Eight lakh liquor stocks hidden in fields confiscated)

Dhule News
Jalgaon: जिल्‍हा परिषदेचे वाढले दहा गट

शेतात दारूचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांमार्फत (Dhule News) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने संबंधित ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. मात्र, पोलीस येत असल्याची भनक संबंधिताला लागल्यानंतर शेजारीच असलेल्या झाडाझुडपांचा आधार घेत चिंतामण मालचे हा पोलिसांना चकवा देत पसार होण्यात यशस्वी झाला.

चार जणांविरूद्ध गुन्‍हा

शेतात लपवून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगाऱ्याखाली ताडपत्रीच्या आवरणाखाली लाखो रुपयांचा दारूसाठा पोलिसांना आढळून आला आहे. या अनुषंगाने चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत जवळपास 8 लाख 81 हजार चाळीस रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com