Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात १५०० हेक्टरवरील पिकांना फटका; मिरची, केळी, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाचा अवकृपेमुळे वाया गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.  

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे साधारण १५५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय वित्त हानी देखील झाली आहे. यात १५ घरांची पडझड झाली असून नंदुरबार तालुक्यातील एका पांझर तलावाला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने पिके खराब होण्यास सुरवात झाली आहे.  

सोमवारपासून पंचनामे 

पावसामुळे जिल्ह्यात सर्वाधिक फटका मिरची, केळी, सोयाबीन यासह कडधान्य आणि भात पिकला बसला आहे. चार दिवसापासून पाऊस सुरु असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी येत होत्या. मात्र सोमवारपासुन प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरवात होणार आहे. जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने लहान मोठे सर्व प्रकल्प भरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : ‘त्याला जंगलात टाका..’, अक्षय शिंदेच्या दफनविधीस विरोध, पाहा व्हिडीओ

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Safai Karamchari Bharti 2024 : परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी; 23000 पदांसाठी मोठी भरती, वाचा सविस्तर

National Fruit: टरबूज हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?

Latur News : जागा वाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच; लातूर जिल्ह्यातील तीन जागांवर ठाकरे गटाचा दावा

SCROLL FOR NEXT