Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार; चांगला दर मिळाल्याने मिरचीकडे कल

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार; चांगला दर मिळाल्याने मिरचीकडे कल

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी बाजारपेठेत ओल्या लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा (Farmer) मिरची लागवडीकडे कल वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीच्या क्षेत्रात २ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Tajya Batmya)

यावर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रात प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीतून तयार मिरचीचे रोप आणून लागवड सुरू झाले असून यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र त्याच सोबत लागवड खर्चात ही वाढ होणार आहे. ग्रामीण भागात मिरची लागवडीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पपई तर काही ठिकाणी कापसाला पर्याय म्हणून मिरची लागवडीकडे कल वाढवला आहे.

नर्सरीतून मिरचीच्या एक रोप सव्‍वा ते दीड रूपयांना मिळत आहे. मिरची एकरी एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकरी दोनशे ते अडीचशे क्विंटल उत्पादन येत असते. खर्च आणि मजुरी काढून चांगला नफा प्राप्त होईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर मागील वर्षाप्रमाणे बाजारात तेजी राहिल्यास अजून नफ्यात वाढ होईल असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठरलं तर मग! 'दृश्यम ३' लवकरच रिलीज होणार, दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

Face Care: चेहरा सॉफ्ट आणि ग्लोईंग हवाय? रात्री झोपताना लावा १० मिनिटात तयार होणारी होममेड पेस्ट

Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप

शिंदेंच्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंसमोर जोडले हात, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: 'अंबादास दानवे यांना पोलिस संरक्षण द्या'; शिवसेना ठाकरे गटाकडून पोलिस आयुक्तांना निवेदन

SCROLL FOR NEXT