Red Chilli Price Saam tv
ऍग्रो वन

Red Chilli Price : मिरचीच्या दरात मोठी घसरण; नंदुरबार बाजार समितीत आवक वाढल्याचा परिणाम

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात असते. यामुळे नंदुरबार जिल्ह्याला मिरचीचे आगार समजले जात असते. शिवाय, नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची स्वतंत्र बाजार समिती आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मिरचीचा आगार म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी आता संकटात सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यानंतर आता मिरचीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मिरचीची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.  

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात असते. यामुळे नंदुरबार जिल्ह्याला मिरचीचे आगार समजले जात असते. शिवाय, नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची स्वतंत्र बाजार समिती आहे. यामुळे येथे आजुबाजुंच्या भागातून देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. सध्या आवक वाढली असल्याने मिरचीच्या दरात देखील घसरण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

मिरचीची आवक वाढली 

नंदुरबारच्या ओल्या लाल मिरचीला दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. हेच दर काही दिवसांपूर्वी दोन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात होता. मात्र मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानंतर दरात झपाट्याने घट झाल्यानंतर शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. आता मिरचीच्या दरात वाढ होणार कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 

शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज आठ हजार ते दहा हजार क्विंटलची आवक होत असून व्यापाऱ्यांकडून मिरचीही कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतर पिकांप्रमाणेच मिरचीला देखील हमीभाव लागू करावा; अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने आता करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT