Navapur Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Navapur Heavy Rain : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान; अजूनही शेतात साचलंय पाणी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना फटका बसला आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : पाच दिवसांपूर्वी नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे तालुक्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतीत पाणी शिरल्याने उभे पिक आडवे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पावसामुळे झाले आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांना फटका बसला आहे. तर गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे देखील नवापूर (Navapur) तालुक्यातील शेती पिकांना फटका बसत आहे. आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिक जगावले होते. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

पंचनामे करण्याची मागणी 

अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तालुक्यातील अनेक भागात नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतातील पीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT