Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात होणार घट, शेतकरी चिंतेत

Nanded News : नांदेड जिल्ह्यात जवळपास ४ लाख १२ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र यातील ३० टक्के क्षेत्रावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : यंदा सुरवातीपासून सततच्या पावसामुळे पिकांवर रोगराई अधिक प्रमाणात पसरली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढला असून यासोबतच मोठ्या प्रमाणात रोग पड्लेला पाहण्यास मिळत आहे. दरम्यान आता सोयाबीनवर यलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

नांदेड (Nanded) जिल्ह्यात जवळपास ४ लाख १२ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मात्र यातील ३० टक्के क्षेत्रावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. अगोदरच (Soyabean Crop ) सोयाबीनवर उंट आळीचा प्रादुर्भाव असताना येलो मोझॅक रोगाने अटॅक केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. 

उत्पनात घट होण्याची शक्यता 

सोयाबीन पिकावर पडलेल्या या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आता सोयाबीन पिकावरील रोगामुळे  आता लागवड खर्च ही निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT