Turmeric Price Saam tv
ऍग्रो वन

Turmeric Price (March 2024): हळदीला मिळाला उच्चांकी भाव; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान

Halad Kimmat: आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. हळदीची बाजारात आवक कमी झाल्याने हळदीला सध्या उच्चांकी भाव मिळत आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

Nanded News

नांदेड : बाजार समितीमध्ये हळदीची आवक सध्या मंदावलेली आहे. यामुळे नांदेडच्या नवीन मोंढा (Nanded) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी भाव मिळाला आहे. हळदीला (Turmeric) चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (Breaking Marathi News)

शेतात लागवड केलेल्या हळदीच्या काढणीला सुरवात झाली आहे. मात्र यंदा जास्त लागवड नसल्याने बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) हळदीची आवक देखील कमीच आहे. आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. हळदीची बाजारात आवक कमी झाल्याने हळदीला सध्या उच्चांकी भाव मिळत आहे. नांदेडच्या नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील १७ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका हळदीला भाव मिळत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत देखील प्रतिक्विंटल १७ हजार इतका दर मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्या शेतकऱ्यांनी हळद साठवून ठेवली, त्या शेतकऱ्यांना या भाव वाढीचा फायदा झाला आहे. सध्या नवीन हळद बाजारात आली नाही. नवीन हळद काढणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसात नवीन हळद बाजारात दाखल होईल. हाच भाव कायम राहिला, तर हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला आर्थिक फायदा हळदीच्या उत्पादनातून होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT