Maharashtra Election 2024: नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची नाका बंदी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतेय तपासणी

Nanded Lok Sabha Constituency 2024 News: जिल्ह्यातील बिलोली, देगलुर, धर्माबाद, भोकर, किनवट, माहुर यासह इतर तालुक्यातून तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात महामार्ग जातात.
Police Naka Bandi
Police Naka BandiSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

Nanded News:

देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सीमेवरती पोलिसांनी कडक बंदोबस्त लावण्यात आला असून वाहनांची तपासणी केली जात आहे. (Latest Marathi News)

Police Naka Bandi
Dhule ZP CEO : जिल्हा परिषदेत सदस्यांनी शिंपडले गोमूत्र; सीईओंच्या बदलीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव

लोकसभा निवडणूक लागल्याने प्रशासन देखील कामाला लागले आहे. निवडणुकीच्या (Lok Sabha) पार्श्वभूमीवर वाहनांमधून काही रक्कम नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे पोलीस (Police) प्रशासनाकडून सीमावर्ती भागात तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्याला तेलंगणा, कर्नाटक या राज्यांची सीमा लागून आहे. जिल्ह्यातील बिलोली, देगलुर, धर्माबाद, भोकर, किनवट, माहुर यासह इतर तालुक्यातून तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात महामार्ग जातात. यामुळे पोलीस प्रशासनाकडून सर्व सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Police Naka Bandi
Taloda News : गहू-तांदळाचा काळाबाजार; नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनांची कसून तपासणी 

नांदेड जिल्ह्यातून अन्य राज्यात जाणाऱ्या या महामार्गावरून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून त्यांची तपासणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com