Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : पपईच्या दरात मोठी घसरण; कापसाचे दरही ६०० रुपयांनी घसरले, उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उत्तमराव कल्याणकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली यासाठी दीड लाख रुपये खर्च आला कल्याणकर यांना पाच लाख उत्पन्न अपेक्षित

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : यंदा शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे. कापूस, सोयाबीनच्या दरात वाढ होत नसून दर खाली घसरत आहेत. कापसाच्या दरात पुन्हा सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. यासोबतच पपईच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. यामुळे कापूस व पपई उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उत्तमराव कल्याणकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली होती. त्यांना यासाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे. एक एकर पपई मधून कल्याणकर यांना जवळपास पाच लाख उत्पन्न अपेक्षित होते. परंतु सध्या वातावरणातील बदलाचा फटका या पपईला बसत असून बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

खर्च निघणे झाले कठीण 

वातावरणातील बदलाचा फटका आणि बाजारात पापईला मिळणार कवडीमोल दर यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे पपई उत्पादक शेतकरी उत्तमराव कल्याणकर यांनी सांगितले. एकवेळ पपईला चांगला भाव मिळत होता. मात्र वातावरण बदलामुळे पपईची गुणवत्ता खालावली असून दर देखील घसरले आहेत. सध्या बाजारात आठ ते दहा रुपय प्रति किलो दर पपईला मिळत आहे. 

कापसाच्या दरात सहाशे रूपयाची घसरण
नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झाली आहे. कापूस केंद्रावर कापसाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी यंदाही निराशाच पडणार अशी स्थिती आहे. दरम्यान चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढ- उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे सहाशे रूपयाची घसरण झाली आहे. जिल्ह्यात काही दिवसापुर्वी कापसाला ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कापसाला ६ हजार ९०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत असून क्विंटल मागे ६०० रूपयांची घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT