Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : रस्त्यावर सोयाबीन फेकत शेतकऱ्यांचे आंदोलन; भाववाढीची मागणी

Nanded News : नांदेड जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून अंदाजित हेक्टरी १३ क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला झाले आहे. त्यातील ५८ हजार ३०० क्विंटल सोयाबीनची शासनातर्फे खरेदी

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: शेतकऱ्यांनी शेतातून काढणी केल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याचे शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन रस्त्यावर टाकत आंदोलन केले आहे. 

अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर सोयाबीनलाही सरकारकडून हमीभावाचे आश्वासन देऊनही भाव मिळाला नाही. नांदेड जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून अंदाजित हेक्टरी १३ क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला झाले आहे. त्यातील ५८ हजार ३०० क्विंटल सोयाबीनची शासनातर्फे खरेदी करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन घरातच ठेवला आहे. 

साधारण २०१४ पासून आजवर सोयाबीनचा भाव ४ हजाराच्या आसपासच आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव तीन पटीने वाढले. मात्र शेतकऱ्याने पिकवलेल्या सोयाबीनला भाव मिळत नाही. यंदा देखील हीच परिस्थिती असून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. 

दरम्यान ऑनलाईनच्या किचकट अटींमुळे शेतकऱ्यांना आपला माल खाजगी आडतीवर विकावा लागत आहे. यावर्षी तरी सर्व आमदारांनी उद्यापासून होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेत मालाला हमीभाव मिळावा. यासाठी आवाज उचलावा ही मागणी करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोयाबीन रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांनी हे आंदोलन करत भाववाढीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT