Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी पक्की पावती घ्यावी; कृषी विभागाचे अवाहन

Nanded News : खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक तालुक्याचे प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: खरीप हंगामातील लागवडीला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी केली जात आहे. बियाणे खरेदी करताना अनेक शेतकरी हे खरेदीचे बिल घेत नाहीत. मात्र बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेणे आवश्यक असून हि पावती प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली असून प्रत्येक तालुक्याचे प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. कापूस बियाणाचे देखील आठ लाख ३७ हजार बियाणे कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. तर सोयाबीनचे एकूण चार लाख ४० हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी विक्री न करता घरी साठवून ठेवले आहेत. त्यामुळे खरीप हंगामात सोयाबीनच्या बियांची कुठलीही कमतरता यंदा भासणार नाही. पाऊस कधी कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. तसेच वेगवेगळ्या उपाययोजना देखील कराव्यात तसेच शेतकऱ्यांनी वेळो वेळी कृषी विभागचे मार्गदर्शन घ्यावे.  

कृषी विभागाने हेल्पलाइन नंबर देखील जारी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचण असल्यास थेट कृषी विभागाशी संपर्क साधावा बोगस बियाणांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणं हे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणी कच्ची पावती देत असेल तर त्याची माहिती कृषी विभागाला कळवावी. तसेच १०० मिलीमिटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. जमीन ओली होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी. दोन लाख मेट्रीक टन खते आपल्याला आवश्यक आहेत. त्यापैकी ९५ टक्के खते आपल्याला प्राप्त झाली आहेत; अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बराटे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT