Wardha News : सहा महिन्यापासून अंडरपासचे काम बंद; काम सुरु करण्याबाबत आमदार कांबळेचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव- आर्वी मार्गांवर अंडरपासचे काम केले जातं आहे. याच मार्गांवर उड्डाणंपुलाचे देखील काम सुरु आहे. यामुळे येथील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी अंडरपासचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. मात्र मागील सहा महिन्यापासून काम बंद आहे. अंडरपासचे हे काम तात्काळ सुरु करण्यात यावे; अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी केली. याबाबत आमदार कांबळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर व विभागीय रेल्वे प्रबंधक यांना पत्र पाठवत मागणी केली.

Wardha News
Dombivali Case: लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयकडून महिला डॉक्टरचा विनयभंग; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव- आर्वी मार्गांवर अंडरपासचे काम केले जातं आहे. याच मार्गांवर उड्डाणंपुलाचे देखील काम सुरु आहे. यामुळे येथील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे. रेल्वे क्रॉसिंग गेट बंद केल्याने आर्वीकडून येणाऱ्या व जुना पुलगाव, गुंजखेडा, वल्लभनगर, सोरटा, वीरूळ, रोहना, रसूलाबादसह इतर गावातील नागरिकांना पुलगाव शहरात प्रवेश करण्यासाठी नदी फैल जवळील मार्गाचा वापर करावा लागत आहे. अंडरपासचे हे काम रेल्वे (Railway) विभागाकडून सुरु करण्यात आले होते. मात्र खोदकाम अर्धवट सोडत मागील सहा महिन्यापासुन अंडरपासचे काम बंद पडले आहे. 

Wardha News
Nandurbar Weather: वादळी वाऱ्यामुळे ८३ हेक्टरला फटका; शहादा तालुक्यात केळी, पपई, फळबागांचे नुकसान

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. यामुळे अर्धवट खोदलेल्या अंडरपासमुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे. नदी फैल येथील मार्ग हा लहान असून या मार्गांवरील रेल्वेच्या मोठ्या पुलाखाली मोठे खड्डे झाले आहे. यामुळे या मार्गांवर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रलंबित अंडरपासचे काम तात्काळ सुरु करावे व कामात होणाऱ्या विलंबची माहिती द्यावी; असे पत्र आमदार कांबळे यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com