अभिजित देशमुख
डोंबिवली : डोंबिवलीतील एका सोसायटीमध्ये एका रुग्णाच्या उपचारासाठी आलेल्या महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. एका प्रसिद्ध फुड पार्सल कंपनीत कार्यरत असलेल्या डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला असून तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा तरुण लिफ्ट उघडताच पळून गेला.
डोंबिवली (Dombivali) पूर्व परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीत वास्तव्यास असलेल्या वयोवृद्ध रुग्णावर फिजिओथेरपीचे उपचार सुरु आहेत. हे उपचार करण्यासाठी मागील काही दिवसापासून एक महिला डॉक्टर रुग्णाच्या घरी येते. दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास महिला डॉक्टर सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये गेली. सहावा मजल्यावर लिफ्टचे दार उघडले. (Crime News) येथे झोमॅटो बॉय दारासमोर उभाच होता. त्याने लिफ्टमध्ये प्रवेश केला. दार बंद होताच त्या तरुणाने महिला डॉक्टरशी अंगलगट करुन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महिला डॉक्टरने प्रतिकार केला. तिने तातडीने लिफ्टचे ग्राऊंड फ्लोअरचे बटन दाबले. लिफ्टचे दार उघडताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने तरुणाची कॉलर पकडत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताला जोराचा झटका देत पळ काढला. तो पळून गेल्यावर महिला डॉक्टरने सहाव्या मजल्यावर प्रत्येक घरात जाऊन झोमॅटो बॉय कोणाकडे आला होता, याबाबत चौकशी केली. यानंतर महिला डॉक्टराने (Manpada Police) मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तीन पोलिस पथके तातडीने तयार करण्यात आली. अवघ्या काही तासातच झोमॅटो बॉय यशवंत धोत्रे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.