Naned News Saam tv
ऍग्रो वन

Nanded News : अतिवृष्टीतील नुकसान अनुदानाचे १८३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात; नांदेड जिल्ह्यात रक्कम वाटपास सुरूवात

Nanded News : पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्तासाठी शासनाने ४२० कोटी ८६ लाख रूपयांचा निधी नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आला होता

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्राचीन नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्याचे सरकारने (Nanded) जाहीर केले होते. यानंतर आता हि रक्कम शेतकऱ्यांच्या (Farmer) बँक खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी (Rain) झाल्याने हताशी आलेले पिक वाया जाऊन शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले होते. पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्तासाठी शासनाने ४२० कोटी ८६ लाख रूपयांचा निधी नांदेड जिल्ह्यासाठी मंजुर करण्यात आला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दीड महिन्यापुर्वी हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असला तरी प्रत्यक्षात तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी संतापले होते. मात्र आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सुमारे १८३ कोटी १९ लाख रूपये शेतक-यांच्या खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

SCROLL FOR NEXT