Cotton Price
Cotton PriceSaam tv

Cotton Price: अवकाळीने कापूस भिजला; प्रतवारी खालावल्याने दरही मिळतोय कमी

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला
Published on

परभणी : पावसामुळे अगोदरच उत्पादनात घाट झाली आहे. यात आणखी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. (Parbhani) वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजल्यामुळे त्याची पत खालावली आहे. या पावसाने भिजलेल्या (Cotton) कापसाला भाव देखील कमी दिला जात आहे. शेतकऱ्याला ६ हजार इतका दराने हा कापूस विकावा लागत आहे. (Tajya Batmya)

Cotton Price
Fraud Case : नोकरीचे आमिष देऊन पाच लाखांत फसवणूक

परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात सहा दिवस अवकाळी पाऊस झाला. रब्बी हंगामासाठी जमिनीत ओलावा वाढल्याने अवकाळीचा पाऊस पोषक ठरला. त्याचवेळी वेचणी राहिलेल्या शेतासाठी घातक ठरला आहे. (Farmer) या पावसाने फुटलेला कापूस भिजला, काही ठिकाणी खाली पडल्याने प्रतवारी खराब झाली आहे. शिवाय हा कापूस भिजला (Cotton Price) असल्याने व्यापारी आता कमी भावात मागत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cotton Price
Rahuri News : भजन गात शेतकऱ्यांनी अडविला महामार्ग; कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी

जास्तीत जास्त ६५०० चा दर 

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाने आधीच उत्पादनात कमी आले असताना अवकाळीने त्यात भर घातली आहे. फुटलेल्या बोंडामधील कापूस भिजल्याने प्रतवारी कमी झाली व त्यात ओलावा असल्याने पांढरे सोने मातीमोल झाले आहे. सद्य:स्थितीत या रेनटच कापसाला सहा हजार ते ६ हजार ५०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com