Nanded Women Group Dairy Business  Saam Tv
ऍग्रो वन

Success Story: उमेदच्या मदतीने किकी गावातील महिलांनी उभारला सामूहिक दुग्ध व्यवसाय, कमाई होतेय लाखो रुपयात

Dairy Business : नांदेड जिल्ह्यातील किकी या गावातील भारत माता समूहाच्या महिलांनी यशस्वी दुग्ध व्यवसाय सुरू केलाय. नांदेड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या किकी गावातील महिलांनी स्वलंबी बनण्यासाठी कंबर कसलीय.

Bharat Jadhav

(संजय सूर्यवंशी, नांदेड)

Nanded Womens Group Dairy Business :

आजच्या महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. हाताला काम नाही. शेती मालाला भाव नाही,आस्मानी संकट यामुळे शेतकरी,शेतमजूर यांच्या आत्महत्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत,आशा परिस्थितीवर मात करत नांदेड जिल्ह्यतील किकी गावातील महिलांनी एकत्र येत दुग्ध व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांच्या कमाईचा मार्ग शोधलाय.(Latest News)

नांदेड जिल्ह्यातील किकी या गावातील भारत माता समूहाच्या महिलांनी यशस्वी दुग्ध व्यवसाय सुरू केलाय. नांदेड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या किकी गावातील महिलांनी स्वलंबी बनण्यासाठी कंबर कसलीय. गावातील या महिलांनी भारत माता समूहाची स्थापना केलीय, त्यातून त्यांनी घरात असलेल्या गाई म्हशी एकत्र करून एकत्रित दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आहे. व्यवसायासाठी कोणताही भागभांडवल नसताना हा दुग्ध व्यवसाय सुरू केलाय.

Nanded Dairy Business

मात्र आता त्यांना "उमेद"ने मदत केलीय त्यातून आता या महिला लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. या महिला पहाटे ५ वाजेपासून आपल्या कामाला सुरुवात करतात. पहाटे गोठ्यात येऊन या महिला म्हशी धुणे, शेण काढणे,चारा टाकणे चारा-खाद्य याची कटाई करणे, दुध काढणे, गोठ्याची साफसफाई करणे ही सर्व कामे सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण करू आपपाल्या घरी परत जातात. तर येथील दुध हे सकाळी साडेसहालाच नांदेडमध्ये विक्रीला जात. गोठ्यातील कामे या महिलांनी वाटून घेतली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही सर्व कामे या महिलाच करतात तर दूध विक्री तेवढी पुरुष करतात. दरम्यान हा व्यवसाय सुरू झाल्याने या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारलीय. २०१९ साली या समूहाची स्थापना करण्यात आलीय. मात्र पुढे कोरोना महामारीत या उद्योगाला संथता आली होती. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योत अभियानाची साथ मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी पुन्हा उभारी घेत मागील ३ वर्षांपासून गुजरात राज्यातून जाफराबादी जातींच्या म्हशींची खरेदी केलीय.

Nanded Dairy Business

ज्यातून त्यांना दररोज १०० लिटर इतकं दूधाच उत्पन्न मिळतंय. तर बाजारात दुधाला ६० ते ७० रुपये लिटर भाव मिळतोय. सर्व खर्च वगळता वर्षाकाठी ७ ते ८ लाख रुपये निव्वळ नफा या महिलांना मिळतोय. जिद्द,चिकाटी आणि मेहनत केल्यास कुठल्याही परिस्थितीवर मात करता येऊ शकते, असा संदेश या महिलांनी दिलाय. इतर महिलांनीही देखील या महिलांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: केव्हा, कुठे रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना? इथे पाहा फुकटात

Maharashtra News Live Updates: बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी महिला आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश

CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची यांची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

Today Horoscope: कामाच्या ठिकाणी होतील वाद, तर काहींचे परदेशी दौरे होतील पक्के; वाचा तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT