Aurangabad News डॉ. माधव सावरगावे
ऍग्रो वन

महावितरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठलय; शेतकऱ्यांचा आरोप

औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील रोहित्रावर अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे जवळ असलेल्या बंधार्‍याने पेट घेतला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - महावितरण शेतकऱ्यांच्या (Farmer) जीवावर उठलय असा आरोप शेतकरी करत आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील रोहित्रावर अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे जवळ असलेल्या बंधार्‍याने पेट घेतला. त्यामुळे बंधारा नजीकच असलेल्या मकाच्या गंजीला आग लागल्याने सोमीनाथ रामराव तूपे या शेतकऱ्यांची सुमारे तीस ते पस्तीस क्विंटल मकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा महसूल विभागाने अद्याप पंचनामा केला नाही.

या शेतकऱ्याला शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतशिवार क्षेत्रामध्ये पालापाचोळा व बंधाऱ्यावर असलेले गवत पूर्णपणे वाळलेले आहे. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आगीचे साधे निमित्त जरी झाले तरी आग ही रोद्ररूप धारण करते. सोमीनाथ रामराव तुपे यांची सुमारे दिड एकर क्षेत्रातील मकाची गंजी बंधाऱ्या लगत शेती शिवारात होती.

हे देखील पहा -

गुरुवारी 31 मार्च रोजी दुपारी चार नंतर अचानक रोहित्रावर शॉर्टसर्किट झाल्यामुळे रोहित्रा खाली असलेल्या पालापाचोळाने पेट घेतला. याच वेळी पालापाचोळा हा बंधाऱ्यालगत असल्याने बंधारा हा सुमारे शंभर ते दीडशे फूट पेट घेत आल्याने या बंधारे लगत असलेल्या मकाच्या गंजीला आग लागली. याच परिसरात पुंडलिक रेउबा तुपे हा तरुण शेतकरी आपला त्याच्या शेतात ठिबक संच जमा करीत होता. सदरील आग लागल्याचे नजरेस पडल्या नंतर त्याने सोमीनाथ तुपे यांचा मुलगा अमोल तुपे याला मोबाईलद्वारे संपर्क साधला. अमोल तुपे व त्याचे कुटुंबीय यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी धाव घेत असताना परिसरातील शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी उपस्थित झाले.

मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणता आली नाही. परिणामी सुमारे तीस ते पस्तीस क्विंटल मका जळून खाक झाली. तसेच जनावरासाठी असलेल्या चाराही या मकाच्या गंजी परिसरात जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत तलाठी यांना माहिती देण्यात आली असून शुक्रवारी तलाठी व मंडळ अधिकारी हे संयुक्तरित्या पंचनामा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांतून होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT