Milk Price Saam Tv
ऍग्रो वन

Milk Subsidy: दूध उत्पादकांना मिळणार अनुदानाचा लाभ, पण...

Milk Price : सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक, शेतकरी यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.आता राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल.

Bharat Jadhav

Milk Price News :

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिलीय. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता सहकारी, खासगी दूध संघांना दूध पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळणार आहे. या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३२ रुपयांचा दर मिळणार आहे. (Latest News)

सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक, शेतकरी यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी अधिवेशनात केवळ सहकारी दूध संघांनाच अनुदान देण्याबाबत निर्णय झाला होता. पण या निर्णयावर टीका झाली होती, कारण राज्यातील ७२ टक्के दूध खासगी संघांना दिलं जातं. त्यामुळं बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहणार होते, त्यामुळे हे अनुदान सरसकट सर्वांना दिलं जावं अशी मागणी केली जात होती. ही मागणी मान्य करत मंत्रिमंडळानं त्यावर शिक्कामोर्तब केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आनंदाची बातमी पण...

आता राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट / ८.३ एसएनएफ या प्रतीकरिता किमान २९ रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर डीबीटीद्धारे देण्यात येतील. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये राबविण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT