मावळ तालुका थंडीने गारठला; जनावरांना देखील ब्लँकेटचे पांघरूण अन् शेकोटी!
मावळ तालुका थंडीने गारठला; जनावरांना देखील ब्लँकेटचे पांघरूण अन् शेकोटी! SaamTvNews
ऍग्रो वन

मावळ तालुका थंडीने गारठला; जनावरांना देखील ब्लँकेटचे पांघरूण अन् शेकोटी!

दिलीप कांबळे

मावळ : हवेतील गारवा व कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक अनेक पर्यायांचा वापर करतात. परंतु, आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांचाही थंडीपासून (cold) बचाव करण्यासाठी चक्क जनावरांना ब्लॅंकेट अंगावर टाकून तसेच समोर शेकोटी पेटवून ऊब देण्याचा अनोखा प्रयत्न वडगाव मध्ये केला आहे. गेल्या महिनाभरापासून सर्वत्रच कडाक्याची थंडी पडली असून हवेतही गारवा असल्याने नागरिक सर्दी, पडसे किंवा थंडी तापाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

हे देखील पहा :

आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जॅकेट, कानटोपी, झोपताना मुलायम ब्लॅंकेट, रजई, ग्रामीण भागात गोधडीचा वापर करतो. अशावेळी जनावरांनाही (Animals) थंडी लागत असेल त्यांनाही त्रास होत असेल याचा विचार मात्र कोणाच्या मनातसुद्धा येत नाही. परंतु जनावरांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याच्या (Farmer) लक्षात मात्र ही गोष्ट आली आणि त्याने आपल्या गोठ्यातील सगळ्या जनावरांना अंगावर ब्लॅंकेट आणि शेकोटी पेटवून ऊब दिली. वडगाव मावळ येथील बाबुराव वायकर असे या प्राणीमित्र शेतकऱ्याचे नाव आहे. 

वायकर यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी नवी शक्कल लढवली. हे मऊ ब्लॅंकेट दररोज या गोठ्यातील जनावरांच्या अंगावर घालतात. मावळ (Maval Taluka) हा शेती प्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भात शेती सोबतच ऊस आणि गुलाब फुलांच्या साठीही प्रसिद्ध आहे. मावळात बैलगाडा प्रेमी मोठ्या प्रमाणात असून बैलगाडा शर्यतीही मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. त्यासाठी लाखो रुपयांचे बैल विकत घेतले जातात.बैलगाडा मालक त्या बैलांची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात.

आता मावळ तालुका थंडीने गारठला आहे. वर्षभर शेतात काम करणारा बैल असो किंवा शर्यती जिंकणारा बैल (Bullock) असो त्याचा थंडीपासून बचाव करण्याकरिता शेतकरी आपल्या घरातील ब्लॅंकेट गोंडपात त्याच्या अंगावर घालून थंडी पासून बचाव करत असल्याचे चित्र सध्या मावळात बघायला मिळत आहे.

आपल्या कुटुंबावर तर कोणीही प्रेम करते हो; मात्र वर्षभर बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) असो  किंवा शेतात नांगर जुंपणारा बैल असो त्याला आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून वागणूक शेतकरी देत असतो. त्याचाही थंडी पासून बचाव व्हावा अशी मनापासून त्याची इच्छा असते. यामुळे निश्चितच या शेतकऱ्याचे आपल्या जनावरांवरील प्रेम दिसते. परंतु त्या बरोबरच यासाठी त्यांनी लढवलेली शक्कल, आपुलकीचीही जाणीव होत आहे. या शेतकऱ्यांमुळे मावळ तालुक्यातील इतर शेतकरी देखील प्राणी प्रेमाचे दर्शन घडवतील हे नक्कीच.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT